Monday 22 January 2018

भारताचे मुख्य निवडणूक आयूक्त पदी ओम प्रकाश रावत यांची निवड

सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांचा कार्यकाल दि. 23 जानेवारीला संपनार असल्याने मुख्य निवडणूक आयुक्तपदी ओम प्रकाश रावत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
ज्योती यांच्या आधी नसीम जैदी मुख्य निवडणूक आयुक्त होते त्यांचा कार्यकाळ जुलै २०१७ मध्ये संपला होता. त्यानंतर अचल कुमार ज्योती यांनी हे पद स्वीकारले. आता ज्योती यांचा कार्यकाळ संपल्याने ओम प्रकाश रावत हे मुख्य निवडणूक आयुक्त असतील. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातली माहिती दिली आहे.


निवडणूक आयोगाच्या नियमांप्रमाणे एक मुख्य निवडणूक आयुक्त असतात आणि इतर दोनजण निवडणूक आयुक्त असतात. या दोघांपैकी जो वरिष्ठ असेल त्याच व्यक्तीला मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राष्ट्रपतींतर्फे नेमले जाते. त्याचनुसार ओम प्रकाश रावत हे आता मुख्य निवडणूक आयुक्त असणार आहेत. तर अशोक लवासा हे निवडणूक आयुक्त असणार आहेत अशीही घोषणा करण्यात आली आहे. अशोक लवासा हे याधी अर्थ सचिव म्हणून काम करत होते अशोक लवासाही २३ जानेवारीपासून पदभार स्वीकारणार आहेत.

Monday 15 January 2018

इस्रायलच्या पंतप्रधानांना भारत दौरा

दि. 14 जानेवारी, 2018 रोजी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. रविवारी नेतन्याहू नवी दिल्लीमध्ये दाखल झाले होते. सोमवारी सकाळी  राष्ट्रपती भवनात त्या गार्ड ऑफ ऑनर दिलं गेलं. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. भारत व इस्रायलमध्ये मैत्रीच्या नव्या पर्वाला सुरूवात झाली आहे, अशी भावना यावेळी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी व्यक्त केली.